Kaustubh's story, source fb- Vikas Santosh Patil
आज माझे मित्र मिलिंद सोनवणे यांचेशी फोनवर बोलत असतांना त्यांचा लहान चिरंजीव कौस्तुभ उर्फ सनी मिलिंद सोनवणे त्यांच्या जवळ खेळत असतांना त्याच्याशी बोलणे झाले सनी ला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे लहानपणा पासून अतिशय वेड असल्याचे कळले त्याने फोनवरून मला छोटेसे भाषण व" दोनच राजे इथे जन्मले" हे गीत त्याच्या बोबड्या पण छान आवाजात म्हणून दखविले त्याला हे वेड त्याच्या आईच्या पोटात असतांना त्यांनी खूप पुस्तक वाचल्याने लागले असे त्यांनी सांगितले तसेच तो नेहमी कपाळावर चंद्रकोर लावल्याशिवाय घराबाहेर निघत नाही व रोज एक तरी वेळा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याकडे चक्कर मारल्याशिवाय जेवत नसल्याचे मिलिंद व कविता सोनवणे यांनी सांगितले....मला खूप कौतुक वाटले मी लगेच मिलिंद ला त्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोलावून घेतले....व त्याला एक ट्रॉफी तसेच त्याचे कौतुक केले....नगरसेवक बशीरदादा बागवान,सुनील पाटील, राकेश पाटील,महालपुरे सर,राहुल बोरसे,मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष एस.ए. पाटील सर, व बाबरुड(राणीचे) गावचे सरपंच मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांचे बंधू मधुतात्या वाघ यांचे कडून कौतुक करण्यात आले....आई जिजाऊ त्याच्या कडून बुद्ध,शिवराय,शाहू,फुले,आंबेडकर तसेच सर्व महापुरुष यांचे विचार वारसा, व समाजसेवा करून घेवोत....
जय जिजाऊ! जय शिवराय! जय भीम!

Comments
Post a Comment